आज जि. प. उच्च. प्राथ. शाळा अरोली मध्ये आनंददायी शनिवार अंतर्गत 1 ते 5 वी मध्ये राष्ट्रभक्तिपर वेशभूषा... 6 वी ते 8 वी मध्ये समूहगीतगायन हे उपक्रम घेण्यात आले.
आज जि. प. उच्च. प्राथ. शाळा अरोली मध्ये आनंददायी शनिवार अंतर्गत 1 ते 5 वी मध्ये राष्ट्रभक्तिपर वेशभूषा... 6 वी ते 8 वी मध्ये समूहगीतगायन हे उपक्रम घेण्यात आले. विध्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शाळेने या विध्यार्थ्यांना सुंदर शालेय साहित्य बक्षीस म्हणून दिल्याने चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला.याबरोबरच शाळा व्यवस्थापन समिती गठन करण्यात आले. नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. दिगंबर नान्हे यांनी शाळेला नेहमी योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची ग्वाही दिली. उपाध्यक्ष व मावळते अध्यक्ष मा. नरेंद्रजी कोकोडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व असेच उत्कृष्ट काम शाळेकडून व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. तज्ञ् सल्लागार म्हणून नियुक्त झालेले मनावधिकार संघटनेचे मा. सुनिलजी हजारे यांनी शाळा प्रगतीपाथावर असून असेच विविध उपक्रमासह गुणवत्ता सुधारण्यावर भर देऊ असं प्रतिपादन केले. यावेळी इतर सदस्य प्रमिला ताई भैसारे, करूणाताई वाघ, सौ शेख, सौ. जांभुळकर, सौ. परतेती, सौ. भिऊगडे,संजयजी मोहनकर, शिवशंकर मदणकर शिक्षक प्रतिनिधी राणी सोळुंके मॅडम विध्यार्थी प्रतिनिधी सिद्धी नाटकर व वंश नाटकर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत समिती सचिव व शाळेचे मुख्याध्यापक मा. संदीप दक्ष सर यांनी केले.यानंतर विध्यार्थ्यांना लोकशाहीची जाणीव व माहिती व्हावी या हेतूने शाळेत गेले आठवडभर शालेय निवडणूक जाहीर झाली होती तर आज मतदान झाले व निकाल जाहीर करण्यात आला यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून सौ शिल्पाराणी पाटील मॅडमनी काम पहिले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मनोरंजक अशी झालेल्या या निवडणूक मध्ये श्री शिवछत्रपती पॅनल निवडून आले व युग यावलकर हा इयत्ता 8 वी चा विध्यार्थी शालेय मुख्यमंत्री बनला.रितू नान्हे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सविता ढाले मॅडम यांनी मानले.
The Global India News Today
द ग्लोबल इंडिया न्यूज़
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0